मेहरुण परिसरात क्रिकेटच्या कारणावरून दगडफेक; पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात…

 

जळगाव समाचार | ९ नोव्हेंबर २०२५

मेहरुण बगीचा परिसरात आज दुपारी क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि काही मिनिटांतच गवळीवाडा, टिपू सुलतान चौक व तांबापुरा भागात दगडफेक झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक, आरसीपी दल तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

दगडफेकीत चार जण जखमी झाले असून काही घरांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही व मोबाईल फुटेजच्या आधारे दंगेखोरांची ओळख पटवून अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. नागरिकांनी शांतता राखावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here