जळगावः तालुक्यातील भोकर गावात किरकोळ कारणावरून एकाला शिवीगाळ करत दोघांकडून मारहाण केल्याची घटना बुधवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर गरबड कोळी (वय ४९) रा. भोकर ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता किरकोळ कारणावरून गावात राहणारे दिपक मधुकर सोनवणे आणि आदित्य धनश्याम सोनवणे दोन्ही रा. भोकर ता.जि. जळगाव यांनी ज्ञानेश्वर कोळी यांचा मुलगा योगेश ज्ञानेश्वर कोळी याला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर कोळी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दिपक मधुकर सोनवणे आणि आदित्य धनश्याम सोनवणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे हे करीत आहे.