जळगाव : धावत्या कारसमोर वाहन लावून कारमधील सोपान सुभाष पाटील (वय ३६, रा. चिंचोली, ता. जळगाव) यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. या प्रकरणी अक्षय पवार (रा. कुसुंबा) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील सोपान पाटील हे (एमएच १९, ईए ००३६) क्रमांकाच्या कारने जात असताना त्यांच्या कारसमोर अक्षय पवार याने वाहन आडवे लावून रस्ता अडविला. त्यानंतर शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अक्षय पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहेत.