जळगाव समाचार डेस्क | ३ नोव्हेंबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकांचा जोर वाढला असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीतील राजकीय रंग विशेष ठरत आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार मंगेश चव्हाण आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. सर्वच उमेदवारांनी प्रचारात कंबर कसली असून आ. मंगेश चव्हाण यांनीही आपला प्रचार प्रभावीपणे सुरु केला आहे.
पहिल्या कार्यकाळात चाळीसगाव शहरात विकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेले आ. मंगेश चव्हाण दुसऱ्या कार्यकाळात स्मार्ट प्रगतीचा निर्धार करत आहेत. त्यांच्या या विकासनिधीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चाळीसगावच्या स्मार्ट विकासासाठी शहरवासीय त्यांना शुभेच्छा देत आहेत.
दि. २ रोजी चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवनेरी हॉटेल चौक, तेली गल्ली, गोट्या मारुती, रथगल्ली, कुरेशी वाडा, जुनी नगरपालिका, देशमुख वाडा, बाजारपेठ, देवी गल्ली, व्ही टी लेन, आडवा बाजार, सोनार गल्ली, अफू गल्ली, बाराभाई मोहल्ला, धनगर गल्ली, देशपांडे गल्ली, देशमुख गल्ली, नदी किनारा, घाट रोड व्यापारी मंडळ, श्री संताजी जगनाडे महाराज चौक घाट रोड आदी भागात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी ‘कमळ’ या निशाणीसमोर बटन दाबून त्यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले.