Monday, December 23, 2024
Homeजळगाव ग्रामीणचाळीसगावमध्ये भाजप महायुतीचे शक्तिप्रदर्शन; आमदार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

चाळीसगावमध्ये भाजप महायुतीचे शक्तिप्रदर्शन; आमदार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

जळगाव समाचार डेस्क | ३० ऑक्टोबर २०२४

भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी आज हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आजवरच्या सर्व गर्दीचे उच्चांक मोडीत काढणाऱ्या या नामांकन रॅलीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर सकाळी नऊ वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली.

महायुतीचे नेते एकत्रित

या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडेसर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, शिवसेना नेते उमेश (पप्पूदादा) गुंजाळ आणि इतर महायुतीचे जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित होते.

जनतेचा महासागर उसळला

तीस हजारांहून अधिक कार्यकर्ते व नागरिक या नामांकन रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत शेकडो वारकरी टाळ-मृदंगासह पोशाखात सहभागी झाले होते, तर लाडक्या बहिणी देखील मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या. रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, गणेश रोड, शिवाजी महाराज चौक मार्गे प्रशासकीय इमारत येथे पोहोचली. आमदार चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय रामराव जीभाऊ आणि इतर महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन केले.

पुष्पवृष्टी आणि नाश्त्याची सोय

रॅलीदरम्यान, शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाकडून पुष्पवृष्टी आणि नाश्त्याची सोय करण्यात आली. आमदार मंगेशदादा चव्हाण व त्यांच्या कुटुंबाने ट्रकवरून जनतेला अभिवादन केले. भाजपमय वातावरणात ही रॅली अतिशय जल्लोषपूर्ण रित्या साजरी करण्यात आली.

“मंगेश चव्हाण होणे सोपे नाही” – मंत्री गिरीश महाजन

रॅलीचे सभेत रूपांतर झाल्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्य गौरवले. मंत्री महाजन म्हणाले, “पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी विकासकामांत दाखवलेली धडपड प्रत्येक आमदाराला प्रेरणा देणारी आहे.” खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार चिमणराव पाटील यांनीही मंगेश चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करत प्रचंड मतांनी त्यांना विजयी करण्याचा आशावाद व्यक्त केला.

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

रॅलीच्या सुरुवातीला तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपला पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी उपस्थित नेत्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे विकास काम जनतेसमोर सादर केले.

आई-वडिलांच्या आशीर्वादाने सुरुवात

आमदार चव्हाण यांनी आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेत चाळीसगावच्या विकासासाठी बळ मिळावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page