जळगाव समाचार | १७ मे २०२५
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
शरद रामा भिल (वय ३५) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. तो कांद्याच्या शेतात मजुरीसाठी गेला होता. सायंकाळी अचानक वादळ आणि पाऊस सुरू झाल्यानंतर तो घरी परतत होता. याचवेळी त्याच्या अंगावर वीज पडली आणि तो जागीच ठार झाला.
शरद भिल हा खर्ची गावचा जावई होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.