- जळगाव समाचार डेस्क| ११ सप्टेंबर २०२४
प्रसिद्ध अभिनेत्री मलाइका अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी बांद्रा येथील सहाव्या मजल्याच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा पोलीस आणि क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या पोलीस तपास करत असून, घटनास्थळावरून अद्याप कोणताही सुसाईड नोट सापडलेला नाही.
तपासादरम्यान अशी माहिती मिळाली आहे की, अनिल अरोरा हे दीर्घकाळ आजारी होते. त्यामुळे ते नैराश्यात होते असेही सांगितले जात आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल.