जळगाव समाचार डेस्क;
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घुमावल बुद्रूकचे माजी माजी सरपंच तथा भाजपचे माजी पदाधिकारी प्रकाश लक्ष्मण पाटील (४४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश पाटील हे घुमावल बुद्रूक येथील घरून शनिवारी सकाळी सातच्या सुमारास बाहेर पडले होते. दरम्यान कामानिमित्त त्यांचे मोठे भाऊ रविकांत लक्ष्मण पाटील हे घुमावल खुर्द शिवारातील शेतात आले. यावेळी त्यांना प्रकाश पाटील यांचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी हि बाब गावात सांगितली त्यानंतर नातेवाईकांनी प्रकाश पाटील यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉ. सुरेश पाटील यांनी मृत घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.