जळगाव समाचार | २ एप्रिल २०२५
चाळीसगाव – धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत लांबे वडगाव येथील माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य प्रकाश निळकंठ पाटील (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली.
प्रकाश पाटील हे दुचाकीने चाळीसगावकडून गावाकडे जात असताना भोरस फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ ओंकार सुतार करीत आहेत.