Monday, December 23, 2024
Homeजळगावबोदवड तालुक्यात महाविकास आघाडीच्या रोहिणी खडसे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

बोदवड तालुक्यात महाविकास आघाडीच्या रोहिणी खडसे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

बोदवड : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, गटाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रोहिणीताई  खडसे खेवलकर यांनी बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो, मनुर खु, मनुर बु, शेवगा खु, धोनखेडा, लोणवाडी, शेलवड येथे प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रचार दौऱ्यात जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक गावात रोहिणी खडसे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध – रोहिणीताई खडसे
महिलांनी औक्षण करून आणि ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात फुलांची उधळण करून रोहिणीताई खडसे आणि सहकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या निवडणुकीत विविध आश्वासने देऊन मतदान मागितले. परंतु, पाच वर्षे सत्ता पक्षात राहूनही दिलेली आश्वासनांची पूर्ती करण्यात ते अपयशी ठरले. गेले पाच वर्षात विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी, महिलांना सुरक्षित वातावरण, शेतीला पाणी, हाताला काम, शेतमालाला योग्य दाम मिळवुन देण्यासाठी हि निवडणूक लढवत असुन “तुतारी वाजवणारा माणुस” या चिन्हा समोरील बटण दाबुन सेवेची संधी देण्याची ग्रामस्थांना विनंती केली. आ. एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकास कामे करण्यात आलेली असुन भविष्यात मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत आ. एकनाथराव खडसे साहेब, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, अरुण पाटिल, उदयसिंह पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची रोहिणीताई खडसे यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली.

यावेळी कैलास चौधरी, रामदास पाटील, विरेंद्रसिंग पाटील, बाळुदादा पाटील, भारत पाटील, आबा पाटिल,
विनोद मायकर, किरण भिसे, अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, सम्राट पाटील, अनिल वराडे , विलास देवकर, अनिल पाटील, भागवत टिकारे , भरतअप्पा पाटील, विलास सिंग पाटिल, गणेश पाटिल, विजय चौधरी, शाम पाटील , अजय पाटील, प्रदीप बडगुजर, मयुर खेवलकर, निखिल पाटील, हकीम बागवान, जाफर शेख, लतिफ शेख, मुजम्मील बागवान, नईम खान, निलेश माळी, दीपक माळी, विनोद कोळी , विजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, जीवन राणे, अमोल कोलते, प्रफुल पाटील, रवींद्र अटक, राजुभाऊ परदेशी, कैलासभाऊ परदेशी, कालू मेंबर, भुरा मेंबर, नजीर सेठ, शामराव पाटील , लक्ष्मण पाटिल, आशाताई टिकारे, प्रमोदभाऊ फरपट, भागवतभाऊ टिकारे, ज्ञानेश्वर माळी, दादाराव सोनन, विकास माळी, राहुल माळी, पंकज शेळके, अजय जंजाळ, ईश्वर बेटोते, अतुल माळी, वैभव माळी,पवन माळी, विलास माळी, संजय गवारे, वैभव पाटील, वसंता पाटील, प्रभाकर पाटील, विलास पाटील,
प्रकाश फरपट, ऋषिकेश पारधी, मयुर फरपट, अशोक माळी आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page