जळगाव : संस्कृत भाषेचे महाकवी व कविकुलगुरु कालिदास मेघदूत,रघुवंश,अभिज्ञान शाकुंतम् सारखे महाकाव्य व नाटकांचे रचनाकार यांचे साहित्य काव्य हे जगामध्ये अजरामर झाले आहे , अशा महान कवीची जयंती मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात संस्कृत विभाग व साहित्य कला आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याचा व लेखन, साहित्या बद्दल संस्कृत विभागाचे प्रा. डॉ.अखिलेश शर्मा यांनी माहिती दिली.
संस्कृत विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी महाकवी कालिदास यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान त्यांच्या अजरामर लेखन साहित्याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी भाषा प्रशाळाचे संचालक प्रा. डॉ.भूपेंद्र केसुर व सामाजिक शास्त्र विभागाचे संचालक प्रा.डॉ.देवेंद्र इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
या वेळी मानव विद्या शाखेचे प्रा. डॉ.जयेश पाडवी, डॉ.दिलबरसिंग वसावे, डॉ.मनोज महाजन, डॉ.विद्या पाटील, डॉ. योगेश महाले, डॉ. राजीव पवार, डॉ.पंडित चव्हाण, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ.राम बुधवंत व विद्यार्थी उपस्थित होते.