जळगाव समाचार डेस्क | १६ जानेवारी २०२५
सर्वांसाठी घरे – २०२४ या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने ‘महाआवास अभियान- ग्रामीण’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट राज्यातील सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत सुविधा पोहोचवणे हे आहे. जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेत अभियानाची सविस्तर माहिती, योजनांची अंमलबजावणी आणि भविष्यातील उद्दिष्टे याबाबत चर्चा केली जाईल. या कार्यशाळेस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.