जळगाव समाचार | १८ नोव्हेंबर २०२५
चांडक कॅन्सर हॉस्पिटल, भुसावळ रोड यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा समस्त वीरशैव लिंगायत समाजासाठी मोफत महा-आरोग्य तपासणी शिबिर व कॅन्सर जनजागृती चर्चासत्र रविवारी, ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत इंडियन रेडक्रॉस सोसायटी, सिव्हिल हॉस्पिटल शेजारी, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक, पॅथॉलॉजी तज्ञ डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ. सुशील गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स्तन, तोंड, फुफ्फुस, आतडे, स्वादुपिंड, गर्भाशय आदी विविध कॅन्सर तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच रेडिएशन, केमोथेरपी व आधुनिक उपचार पद्धतींबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले जाणार आहे.
रुग्णांच्या शस्त्रक्रिया व पुढील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
महिला व पुरुषांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी त्वरित नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्था, जळगाव तर्फे करण्यात आले असून अध्यक्ष संदीप वाणी, कार्याध्यक्ष विशाल लिंगायत, उपाध्यक्ष गजानन आकाशे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहभागाची विनंती केली आहे.
संपर्क क्रमांक (आयोजक मंडळ) :
• संदीप वाणी (अध्यक्ष) – 9422618208
• विशाल लिंगायत (कार्याध्यक्ष) – 9921954477
• गजानन आकाशे (उपाध्यक्ष) – 9860915505
• पंकज सदावर्ते (मीडिया प्रमुख) – 9403141591
• सिद्धेश्वर साखरे – 9922932295
• समीर गुळवे – 9561111002
• रवींद्र रेंगे (बोदवड तालुका अध्यक्ष) – 8600804625
• सुरेश मानेकर (भुसावल अध्यक्ष) – 9890867300
• किशोर वाणी (यावल तालुका) – 9960794046
• विनोद तोडकर (जामनेर तालुका) – 8788271134
• संदीप मिटकरी (संस्था सचिव) – 9923376777
• जितेंद्र आंबेकर – 9890468887

![]()




