जळगाव समाचार | २८ ऑगस्ट २०२५
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात पार पडणार आहे. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
लोकशाही दिनी विविध विषयांवरील तक्रारींवर सुनावणी होणार असून, तक्रारदारांना प्रत्यक्ष अर्जासह उपस्थित राहता येणार आहे. संबंधित विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्या घेऊन या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.