जळगाव समाचार | ४ नोव्हेंबर २०२५
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकांमध्ये राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय १५ नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींचा देखील समावेश आहे. एकूण २८८ सदस्यांची निवड या निवडणुकीतून केली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे –
• १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
• १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
• २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची संधी
• २ डिसेंबर – मतदानाचा दिवस
• ३ डिसेंबर – मतमोजणी व निकाल जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आयोगाने सांगितले की, दुबार मतदारांची स्वतंत्र नोंद करण्यात आली असून त्यांच्यासाठी वेगळी यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मतदारांना त्यांच्या निश्चित मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावता येईल.

![]()




