गावठी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसांसह एकाला अटक…

 

जळगाव समाचार डेस्क | २९ ऑगस्ट २०२४

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरणगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना एका संशयिताला गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता झालेल्या या कारवाईत संशयिताकडून २५ हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अटक केलेल्या आरोपीचे नाव राज उर्फ मनोज सुरेश शिंदे (वय ३९, रा. रामपेठ, वरणगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरात पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना राज शिंदे याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना याबाबत माहिती दिली.
पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील आणि पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांच्या पथकाने त्वरित कारवाई करत राज शिंदे याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here