राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाईत जिल्ह्यात बनावट मद्यसाठा जप्त: ५.७९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…

 

जळगाव समाचार डेस्क| ७ ऑगस्ट २०२४

राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभागाने सावखेडा (ता. अमळनेर) परिसरात बनावट दारूसाठा वाहतूकीवर मोठी कारवाई केली आहे. दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी निरीक्षक के.एन. गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सावखेडा शिवार येथे चोपडा-अमळनेर रोडवर सापळा रचून वाहन क्रमांक एमएच-30 बीडी-1103 हे वाहन तपासण्यात आले. तपासणीमध्ये देशी आणि विदेशी बनावट दारूसाठा आढळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल
वाहनात आढळलेल्या बनावट दारूसाठ्यात खालील समावेश आहे:
– 25 बॉक्स टँगोपंच देशी दारू (180 मी.ली. 2544 बाटल्या)
– 5 बॉक्स मॅंकडोवेल नं. 1 व्हिस्की (180 मी.ली. 240 बाटल्या)
– 5 बॉक्स इम्पेरिअल ब्लू व्हिस्की (180 मी.ली. 240 बाटल्या)
सदर अवैध बनावट मद्यसाठा व वाहन एकूण किमती रुपये 5,79,480/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींवर गुन्हा नोंद
वाहनासोबत मिळून आलेले शुर्भम सुधाकर पाटील (रा. अरूननगर चोपडा) आणि कैलास देविदास वाघ (रा. श्रीरामनगर-2 चोपडा) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संचालक पी.पी. सुर्वे, विभागीय उप आयुक्त उषा वर्मा, आणि अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास निरीक्षक के.एन. गायकवाड आणि अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here