जळगाव (प्रतिनिधी) :दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी (वय २५, रा. धरणगाव) असे अटक केलेल्या रट्याचे नाव आहे. वैभव चौधरी याच्याविरुद्ध यापुर्वी धरणगाव आणि धुळे येथील पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. धरणगाव शहरातील कोट बाजार परिसरात राहणारे जहीर आलम शकील अहमद यांच्या घराच्या अंगणातून मोटरसायकल व मोबाईलची ४ ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी दि. ६ ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटरसायकल चोरून नेताना काही लोकांनी वैभव चौधरी यास पाहिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. जितेंद्र पाटील, दीपक मंlळी, रवींद्र पाटील असे सर्वजण धरणगाव तालुक्यातील गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात मग्न असतांनाच या गुन्ह्याचा देखील तपास लागला. अटकेतील वैभव चौधरी याला धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल महेंद्र बागुल करत आहेत.