डोनाल्ड ट्रंप देणार लाडक्या बहिणींना 2100 रुपये? रोहिणी खडसे यांचे ट्विट…

जळगाव समाचार | १३ मे २०२५

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. निवडणुकीदरम्यान या योजनेअंतर्गत महिलांना 1500 ऐवजी दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सत्तेवर आल्यावरही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही, यावरून विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक मजेशीर मीम शेअर करत सरकारवर चिमटा घेतला. या मीममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या शैलीत, अजित पवार यांच्यासोबतच्या चर्चेनंतर ‘2100 रुपये मंजूर’ झाल्याची घोषणा दाखवण्यात आली आहे.

सध्या या योजनेतून पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जात आहेत. मात्र 2100 रुपये कधीपासून मिळणार, याकडे अनेक महिलांचे लक्ष लागले आहे. योजनेवरून सरकारवर आर्थिक ताण येत असल्याचे बोलले जात आहे, तसेच इतर योजनांचा निधी वळवून खर्च केला जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे.

सरकारने अजूनही अधिकृत घोषणा न केल्यामुळे या योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here