Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगलाडकी बहीण योजना; फॉर्म भरतांना आता नाही येणार अडचण, सरकारची नवीन वेबसाईट...

लाडकी बहीण योजना; फॉर्म भरतांना आता नाही येणार अडचण, सरकारची नवीन वेबसाईट सुरु…

 

जळगाव समाचार डेस्क| २ ऑगस्ट २०२४

महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजना म्हणजेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बाबत सर्वात मोठी खुशखबर आता सर्व महिलावर्गासाठी आली आहे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्यभरात सर्वर डाऊन मुळे किंवा काहीनाकाही त्रुत्यांमुळे अडचणी निर्माण होत होत्या मात्र या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी एक संकेतस्थळ सुरू केले आहे.
महिलांना आता हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही पटापट भरता येणार आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरता www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ काल दि. 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

अद्यापही अर्ज सादर न केलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येतील. या संकेतस्थळावर आपल्याला गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज भरताना कोणती कागदपत्रं लागणार?

  • आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
  • लग्नाचं प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज कुठे आणि कसा भरायचा?
योजनेसाठीचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅप/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page