Monday, December 23, 2024
Homeजळगावपीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी 25 हजारांची लाच घेताना लेखा अधिकारी जाळ्यात

पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी 25 हजारांची लाच घेताना लेखा अधिकारी जाळ्यात

पुण्याच्या सीबीआयची कारवाई

जळगाव-वडिलांच्या नावावर असलेल्या फॉर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंट साठी 25000 ची लाच स्वीकारताना जळगावच्या पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकार्‍याला पुण्याच्या सीबीआय पथकाने रंग हात अटक केली असून पीएफ कार्यालयातील ही पहिलीच कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. रमण वामन पवार वय 58 असे या लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की तक्रारदार सचिन माळी यांच्या वडिलांच्या नावावर कामगार पुरवठा करणारी फॉर्म असून ते गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने पीएफ कार्यालयातून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच लेखाधिकारी रमण पवार यांनी याचे लेखापरीक्षणही केले होते मात्र अहवाल दिला नसल्याने याबाबत तक्रारदार यांनी विचारणा केली असता पवार यांनी काही त्रुटी असल्याचे सांगून मार्च 2023 च्या पेमेंट मध्ये चूक असल्याचे सांगितले. फॉर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंट साठी सुरुवातीला 50 हजारांची मागणी पवार यांनी केली होती मात्र तडजोड अंति पंचवीस हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदार माळी यांनी पुणे येथील सीबीआय कार्यालयात तक्रार दिल्यानुसार हा सापळा रचण्यात आला. दरम्यान कारवाईपूर्वी सीबीआयच्या पथकाने घटनास्थळाची चाचणी करून 56 मिनिटांचे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून तयार केले आहे. रमण पवार यांना 11 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

 

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page