नवी दिल्ली, जळगाव समाचार डेस्क;
भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Bharatratna Laal krishna Adwani) यांना बुधवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अडवाणी यांना वृद्धापकाळाशी संबंधित समस्येमुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना एम्सच्या जेरियाट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट जारी केले आहे. अडवाणी यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, सध्या अडवाणी यांची प्रकृती ठीक आहे. सध्या त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी 96 वर्षांचे झाले आहेत.
यावर्षी भारतरत्न मिळाला
अडवाणी यांना यावर्षी भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती आणि म्हणाले की हा केवळ त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या आदर्श आणि तत्त्वांचाही सन्मान आहे.