Sunday, December 22, 2024
Homeजळगावमु जे महाविद्यालयात खेलो इंडिया KRITI मूल्यांकन शिबिराचे आयोजन...

मु जे महाविद्यालयात खेलो इंडिया KRITI मूल्यांकन शिबिराचे आयोजन…

 

जळगाव समाचार डेस्क| २ सप्टेंबर २०२४

राष्ट्रीय स्तरावरील उभरत्या खेळाडूंच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी ‘खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन’ (केआयआरटीआय) मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या शिबिरात विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंची कौशल्ये तपासण्यात येणार असून, त्यातून भविष्यातील क्रीडा तारे बनण्यास मदार होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या वेळी खडसे खेळाडूंना मार्गदर्शन करतील तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांबाबत चर्चा करतील. खेळाडूंच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करून त्यांना योग्य प्रशिक्षण व संधी उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
जळगाव आणि परिसरातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंना या शिबिरामुळे मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. खेळाडूंच्या सहभागाने आणि मार्गदर्शकांच्या प्रयत्नांमुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page