जळगाव समाचार | २ मे २०२५
केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी ७ वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले. या पवित्र क्षणाला हजारो भाविकांनी उपस्थित राहून “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमवला. दरवाजे उघडण्याच्या वेळी हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी प्रथम दर्शन घेतले. अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू झाली असून, लवकरच बद्रीनाथ मंदिराचे दरवाजेही उघडले जाणार आहेत.
मंदिर १०८ क्विंटल फुले आणि हारांनी सजवण्यात आले असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. सुमारे १५ हजार भाविकांसाठी रात्रीच्या मुक्कामाची सुविधा केली आहे. दर्शनासाठी टोकन प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने सांगितले आहे.

![]()




