जळगाव समाचार | २३ ऑगस्ट २०२५
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथील कर्मचारी कृष्णा गवळी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या पुरस्कार सोहळ्यात शैक्षणिक प्रशासन व सेवाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान गवळी यांना मिळाला.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आर. डी. कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते गवळी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, डॉ. संजीव गिरासे, प्रा. म. सु. पगारे, शिवाजी पाटील, अॅड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील, अधिष्ठाता जगदीश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कृष्णा गवळी यांच्या या सन्मानाबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.