महिलांच्या हाताला काम देण्यासाठी कल्पना फाउंडेशनचा पुढाकार…

 

जळगाव समाचार डेस्क। ११ ऑगस्ट २०२४

 

नुकत्याच झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत 40 महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती. या बैठकीत महिलांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन कल्पना फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या बैठकीत अगरबत्ती व पत्रवाळी बनवण्याच्या व्यवसायांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित 110 महिलांनी या व्यवसायांबद्दल माहिती घेतली व हे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मशनरीची उपलब्धता व कर्जपुरवठा याविषयी चर्चा केली.

स्वप्नील पाटील यांनी महिलांनी तयार केलेला माल खरेदी करण्याची “बायबॅक गॅरंटी” देत, महिला उद्योजकांना आर्थिक स्थैर्य देण्याचे आश्वासन दिले. तेरा महिला बचत गटांनी या कामासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.

शाश्वत विकास व पायाभूत आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करत, महिलांना या संधीचा फायदा घेण्याची तयारी दर्शवली आहे. हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here