जळगाव समाचार डेस्क | २७ जानेवारी २०२५
जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.
नूतनीकरणानंतर कार्यालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. कार्यालयात नियोजन अधिकारी, कर्मचारी आणि बैठकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटनावेळी पालकमंत्र्यांनी इतर शासकीय कार्यालयेही सुसज्ज करण्याची सूचना दिली.
रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली
परधाडे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 12 जणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

![]()




