रांची, जळगाव समाचार डेस्क;
झारखंडच्या मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत हेमंत सोरेन आणि आमदार प्रदीप यादव आणि विनोद सिंहही उपस्थित होते.
राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले, “काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि राज्याची जबाबदारी मिळाली. हेमंत सोरेन परत आल्यानंतर आमच्या आघाडीने हा निर्णय घेतला आणि आम्ही हेमंत यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली.