Sunday, December 22, 2024
Homeजळगावमाजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते जे.डी.सी.सी बँकेच्या तालुका शाखांचा सत्कार...(व्हिडीओ )

माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते जे.डी.सी.सी बँकेच्या तालुका शाखांचा सत्कार…(व्हिडीओ )

 

जळगाव समाचार डेस्क;

जळगाव (Jalgaon) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव विभागीय कार्यालय नवीपेठ (दगडी बँक) यांच्यातर्फे आज तालुक्यातील शाखा व्यवस्थापकांना ठेवींचा इष्टांक पूर्ण केल्या बद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माजी महापौर तथा संचालक (जे.डी.सी.सी बँक) जयश्रीताईं महाजन या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते बँकेच्या तालुका व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत व्यासपीठावर विभागीय व्यवस्थापक शेखर पाटील व माजी व्यवस्थापक श्री. चौधरी हे उपस्थित होते.

व्हिडीओ लिंक

यावेळी त्या म्हणाल्या कि, या बँकेला दगडी बँक म्हणून ओळखले जाते, आणि तुम्ही सर्व त्या बँकेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी कार्य करत आहात. त्यामुळे या गुणगौरव सोहळ्याला विशेष महत्व आहे. तुमच्या सर्वांच्या मेहनतीने बँक अजून उत्तरोत्तर प्रगती करेल अशी आशा आहे. सोबतच त्यांनी आधुनिकते कडे वळून बँकेने अजून जोमाने वाटचाल करावी, जेणेकरून कार्याला अजून गती मिळेल असेही म्हटले.

 

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page