जळगाव समाचार डेस्क;
महाविकास आघाडीच्या आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना जळगाव (Jalgaon) शहराच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी महायुती सरकारला टोला लागवतांना म्हटले की, महिलांना दिल्या जाणाऱ्या सर्व योजना या फक्त मत मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, या नवीन योजना फक्त निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी जनतेला दिलेलं गाजर आहे. आणि ती योजना प्रत्यक्षात कधी आमलात येईल आणि त्याचा लाभ कोणाला होईल हे सांगता येत नाही. सोबतच त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी सुरू असणाऱ्या आंदोलनाबाबत म्हटले की, शेतकऱ्यांना योग्य तो न्याय हा मिळालाच पाहिजे.
व्हिडीओ लिंक
https://fb.watch/tfBp04L_U6/?mibextid=v7YzmG