वरणगाव येथील जवान अर्जुन बावस्कर यांचे कर्तव्यावर निधन…

जळगाव समाचार | २५ मार्च २०२५

वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरमधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५) यांचे आसाममधील लेखपली येथे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

अर्जुन बावस्कर हे कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय सैनिक होते. गेल्या १३ वर्षांपासून त्यांनी देशाच्या विविध भागांत सेवा बजावली. सेवानिवृत्तीला अवघी दोन वर्षे बाकी असताना त्यांचे अकस्मात निधन झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांचा अंत्यविधी २७ मार्च रोजी गुरुवारी त्यांच्या राहत्या घरातून निघून शहरातील मुख्य स्मशानभूमीत शासकीय इतमामात पार पडणार आहे. त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुले आणि मोठा कुटुंबीय परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here