जळगाव समाचार | २ मे २०२५
जामनेर तालुक्यातील खर्चाणे येथील शेतकरी बाबुराव बंडू पाटील यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता घडली, जेव्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरु होता.
बाबुराव पाटील म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून ते शेतजमिनीची मोजणी व्हावी म्हणून अर्ज करत आहेत. अनेक वेळा कार्यालयात जाऊन विनंती केल्यानंतरही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या निष्क्रियतेमुळे हताश होऊन त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला, मात्र तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून त्यांना वाचवले.
हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.