जळगाव समाचार डेस्क;
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून पुन्हा एका मुलीवर अत्याचाराच्या (Rape) घटनेने महिला सुरक्षेच्या कायद्यांचा गुन्हेगारांना भय नसल्याचे चित्र दिसत आहे. 24 जुलै रोजी जामनेरात तरूणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. (Crime) याबाबत जामनेर पोलीसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात 18 वर्षीय पिडीत तरूणी बुधवार 24 जुलै रोजी सकाळी घरात एकटी असल्याचा फायदा घेत गावातील तरुणाने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढून तो फरार झाला.
याप्रकरणी पिडीत तरूणीने जामनेर पोलीस ठाण्यात जात सर्व घटनेचे कथन करून आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे हे करीत आहे.

![]()




