जामनेरमध्ये जलतरण तलावात पडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू…

जळगाव समाचार डेस्क | २९ जानेवारी २०२५

शहरातील सोनबर्डी येथे असलेल्या जलतरण तलावात पडून १५ वर्षीय संकेत पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २८ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.

संकेत हा आठवीत शिकत होता आणि मामाकडे राहायला आला होता. तो तलाव पाहण्यासाठी मित्रांसोबत गेला असता अचानक पाण्यात पडला. स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले, पण तो मृत घोषित झाला.

हा तलाव दोन वर्षांपासून बंद होता आणि अलीकडेच त्यात पाणी सोडले होते. मात्र, सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here