फत्तेपूर ता. जामनेर : पावसामुळे मातीच्या भित्ती जिर्ण झाल्याने अनेक ठिकाणी भित्ती कोसळून जिवीत व वित्त हाणी होत आहे दि. २९ सप्टेबर रोजी गोठ्यात बांधलेल्या वासरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या कोंडू बसनदास नाईक (६३) या इसमाचा देखील पावसाच्या पाण्यामुळे जिर्ण झालेली भिंत अंगावर कोसळून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गोद्रीतांडा येथे घडली. गोद्रीतांडा येथील बंजारा वस्तीमध्ये एकाच दिवसी एकाच कुटुंबातील दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून मयतांचे शवविच्छेदन करून त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले.