जळगाव समाचार | ४ एप्रिल २०२५
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याला १५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या अधिकाऱ्याने शासकीय कामासाठी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील १५ हजार रुपये घेताना शुक्रवारी (४ एप्रिल) दुपारी त्याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईनंतर आरोग्य विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून, जळगाव एसीबीचे पथक त्यांच्याकडून माहिती घेत आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.