जळगाव समाचार डेस्क | २० नोव्हेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जिल्ह्याने 54.69% इतकी सरासरी मतदानाची टक्केवारी नोंदवली. जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये रावेर मतदारसंघाने 62.50% मतदानासह सर्वोच्च स्थान पटकावले, तर जळगाव सिटी मतदारसंघाने 45.11% मतदानासह सर्वात कमी टक्केवारी नोंदवली.
मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी:
• अमळनेर (१५): 55.10%
• भुसावळ (१२): 52.44%
• चाळीसगाव (१७): 56.05%
• चोपडा (१०): 52.13%
• एरंडोल (१६): 58.36%
• जळगाव सिटी (१३): 45.11%
• जळगाव ग्रामीण (१४): 60.77%
• जामनेर (१९): 57.34%
• मुक्ताईनगर (२०): 59.69%
• पाचोरा (१८): 46.10%
• रावेर (११): 62.50%
जळगाव ग्रामीण आणि मुक्ताईनगर मतदारसंघांनी अनुक्रमे 60.77% व 59.69% मतदानासह उत्तम कामगिरी केली. दुसरीकडे, पाचोरा (46.10%) आणि जळगाव सिटी (45.11%) मतदारसंघात मतदान कमी असल्याचे दिसून आले.