जळगाव समाचार डेस्क| २४ जुलै २०२४
जळगाव (Jalgaon) शहरानजीक असलेल्या उमाळे येथे 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिल कमलाकर जाधव असे मयताचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कमलाकर जाधव (35) उमाळे ता.जि.जळगाव येथे शेत मजुरीचे काम करत आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. दरम्यान सोमवारी २२ जुलै रोजी रात्री तो घरातून बाहेर निघून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान उमाळे गावापासून जवळ असलेल्या एका पाझर तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. याबद्दल माहिती मिळताच गावकर्यांनी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मयताच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

![]()




