Monday, December 23, 2024
Homeजळगावजिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते

 

जळगाव समाचार डेस्क;

जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत ११ सुवर्ण, ५ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते ठरलेत. तर ८ सुवर्ण, ४ रौप्यपदक पटकावत रावेर तालुका द्वितीय, ४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन पाचोरा संघ तृतीय क्रमांकाने विजयी ठरलेत. (Jalgaon)
जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता. १४) जुलै ला जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन गुणवंत खेळाडू पुरस्कार प्राप्त विशाल बेलदार यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन स्पोर्टस् अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, महेश घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर स्पर्धा या अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल शिरसोली रोड जळगाव येथे इलेक्ट्रॉनिक स्कोरीग सिस्टीम वर जागतिक तायक्वांडो संघटनेच्या नियमांचे पालन करुन घेण्यात आली. स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची १९ ते २१ जुलै रोजी चंद्रपूर येथे कॅडेट राज्य स्पर्धेसाठी तसेच २५ ते २७ जुलै रोजी बीड येथे होणार असलेल्या ज्युनियर मुलं व मुली यांच्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ही स्पर्धा या इलेक्ट्रॉनिक स्कोरीग सिस्टीम वर घेण्यात आली. पंच म्हणून निलेश पाटील, यश शिंदे, अमोल जाधव, जयेश बाविस्कर यांनी काम पाहिले, स्पर्धा यशस्वीतेसाठी पुष्पक महाजन, दानीश तडवी, दर्शन कानवडे आदींनी सहकार्य केले.
स्पर्धेतील कॅडेट सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे मुले : अर्थव सोनार ( रावेर ), सोहम कोल्हे (बोदवड), निल सोनवणे (पाचोरा), मयुर पाटील (जळगाव), ईशांत चौधरी (पहुर), अमर शिवलकर (रावेर)
मुली : आराध्या पाल (बोदवड ), स्वाती चौधरी (पहुर), ज्ञानेश्वरी दिक्षित (रावेर), हर्षदा गायकवाड (रावेर), कोमल गाढे (जळगाव), समृद्धी कुकरेजा (जळगाव), रेवती देशमुख (पाचोरा)
ज्युनियर मुलं: ४५ किलो (सतिश क्षिरसागर) पहूर, ४८ किलो ( साई निळे ) रावेर, ५१ किलो (सिद्धांत घेटे) रावेर, ५५ किलो (अनिरुद्ध महाजन) जळगाव, ५९ किलो (लोकेश महाजन) रावेर, ६३ किलो (प्रबुद्ध तायडे) रावेर, क्षितीज बोरसे (पाचोरा)
मुली : ४२ किलो (सिमरन बोरसे) जळगाव, ४४ किलो (देवयानी पाटील ) जळगाव, ४६ किलो (नाव्या वराडे) चाळीसगाव, ४९ किलो (वैष्णवी सातव) जळगाव, ५२ किलो (निकीता पवार) जळगाव, ५५ किलो (जागृती चौधरी) पहूर, ५९ किलो (ऋतुजा पाटील) पाचोरा, ६३ किलो (श्रावणी मोरे) जळगाव, ६८ किलो (स्पर्श मोहिते) जळगाव
सदर खेळाडूंना जयेश बाविस्कर (जळगाव), हरीभाऊ राऊत (पहुर), सुनील मोरे (पाचोरा), जिवन महाजन (रावेर), जयेश कासार (रावेर), शुभम शेटे (चाळीसगाव) याचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन यांनी कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page