जळगाव समाचार डेस्क| ४ ऑगस्ट २०२४
सध्या तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठे कारण म्हणजे घरातील कमी होणारा सुसंवाद.अश्यातच जळगाव (Jalgaon) शहरात एका एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे.अश्विनी प्रकाश पाटील असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कासमवाडी परिसरात अश्विनी पाटील ही विद्यार्थीनी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होती. अश्विनीचे वडील प्रकाश पाटील हे खासगी वाहनावर चालकाचे काम करून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवतात. अश्विनीही काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. याच कारणावरुन शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी घरी कोणी नसताना अश्विनीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ आहेत.