जळगाव शहरात १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या…

0
60

जळगाव समाचार डेस्क | १५ सप्टेंबर २०२४

व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल परिसरातील १९ वर्षीय महिमा नंदलाल सनान्से हिने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघड झाली. ही घटना दुपारी १ ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा तिच्या घरात कोणीच नव्हते. महिमाच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महिमा आपल्या आई-वडील आणि भावंडांसोबत व्यंकटेश नगरातील घरी राहत होती. तिचे वडील नंदलाल हे सलून व्यावसायिक आहेत आणि या व्यवसायातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी महिमाची आई घराच्या समोरील दुकानाजवळ काही वेळ बसली होती, तेव्हा महिमा घरात एकटीच होती. काही वेळानंतर महिमाची

आई घरी परतल्याव घेतलेल्या अवस्थेत महिमा गळफास लटकलेली दिसली. या दृश्याने तिच्या आईने एकच हंबरडा फोडताच, कुटुंबातील इतर सदस्य आणि शेजारी धावून आले.

महिमाला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या वेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. महिमाच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. महिमा मनमिळावू आणि हसतमुख स्वभावाची असल्यामुळे तिच्या आत्महत्येने परिसरातील नागरिकांमध्येही दुःखाचे वातावरण आहे.

या घटनेची नोंद रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here