जळगाव शहरात चित्रा चौकातील दारूच्या दुकानावर दरोडा…

 

जळगाव समाचार डेस्क| २४ जुलै २०२४

जळगाव (Jalgaon) शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या चित्रा चौक भागात नेहमीच वर्दळ असते मात्र या अत्यंत रहदारीच्या परिसरात असलेल्या दारू विक्रीच्या दुकानातून तीन चोरट्यांनी दगडाचा धाक दाखवत दारूच्या बाटल्या आणि सात हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे. दि. २१ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य बाजारपेठेला लागून चित्रा चौक येथे नीलम वाईन शॉप नावाचे दारु विक्रीचे दुकान आहे. याठिकाणी मुकुंदा भास्कर कोल्हे हे मॅनेजर म्हणून काम करतात. या दुकानाभोवती नेहमीच ग्राहकांची तसेच वाहतुकीमुळे वर्दळ असते. रविवार दि. २१ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास या दुकानावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी दगडाचा धाक दाखवून येथे काम करणाऱ्या सलीम तडवी याला शिवीगाळ करत, दुकानातील गल्ल्यातून ७ हजार रुपयांची रोकड हिसकावून काढली तसेच दुकानातील दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. दरम्यान या घटनेनंतर लागलीच दुकानाचे मॅनेजर मुकुंदा कोल्हे यांनी जळगाव शहर ठाण्यात जाऊन सर्व घटना कथन केली. त्यानुसार सोमवारी २२ जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here