जळगाव समाचार डेस्क| ३ ऑगस्ट २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव (Jalgaon) जिल्हा महिलाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संबंधीचे पत्र राष्ट्रावादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
कल्पना पाटील यांच्याविषयी थोडक्यात…
कल्पना पाटील या गेल्या 18 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षासाठी कार्य करत आहेत. त्यांनी पक्षबांधणीसाठी आपले भरीव योगदान जिल्ह्याला दिले आहे. मूळ प्राध्यापिका म्हणून आपलं कार्य सुरु करणाऱ्या कल्पना पाटील यांनी नोकरी सोडून स्वतःला समाजसेवेत झोकून दिले. यावेळी त्यांनी देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षा म्हणजेच MPSC व UPSC पास होऊन देखील त्यांनी आपला वेगळा मार्ग निवडला.
अनेक पद भूषविले…
या आधी त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अनेक पदांवर होत्या. त्यात महत्वाचे म्हणजे त्या प्रदेश सचिव, प्रदेश उपाध्यक्ष, ग्रंथालय सेल च्या प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रीय सरचिटणीस व महिला जिल्हाध्यक्षा (ग्रामीण) असे अनेक पद त्यांनी भूषवले आहेत.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित…
त्यांच्या राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक कार्याची दाखल हि वेळोवेळी घेतली गेली आहे, त्याचेच फलश्रुती म्हणून त्यांना अनेक सामाजिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ज्यात प्रामुख्याने, सावित्रीबाई फुले पुरस्कार, जिजाऊ पुरस्कार, स्त्री भृणहत्या जनजागृतीसाठी यशस्विनी पुरस्कार, स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार.