जुने बीजे मार्केट जलमय; व्यापाऱ्यांचे हाल
जळगाव समाचार डेस्क
शहरातील मध्यवर्ती भागात स्थित भिकमचंद जैन व्यापारी संकुलात अनेक शेतीशी निगडित व्यापारी, तसेच कुटुंब न्यायालय, कामगार न्यायालय त्याच बरोबर अनेक शासकीय आस्थापनांचे कार्यालये आहेत.
इतके असूनही येथे पावसाच्या पाण्याचा निचरा किंवा त्यानं मार्गस्थ होण्यासाठी गटारी मात्र नाहीत. ज्या आहेत त्या थोड्याश्या पावसात तुडुंब भरुन त्यातील पाणी हे बाहेर येते. अश्या परिस्थितीमुळे तेथील व्यापारी व सरकारी कर्मचाऱ्यांसह सामन्यांचे हाल होत आहेत.
आज दुपारी शहरात बरसलेल्या दमदार पावसाने जळगावकर सुखावला आहेच, मात्र अनेक व्यापारी संकुल व शासकीय आस्थापनांच्या कार्यालात कमानिमित्त येणाऱ्यांची चांगलीच कवायत झाली. या होणाऱ्या गैरसोयीमुळे जळगाव मनपाने केलेली मॉन्सूनपूर्व कितपत तत्परतेने तयारी केली आहे ते दिसून येत आहे. यासर्वात हाल मात्र सर्वसामान्य जनतेचेच होत आहेत.
उतारामुळे पाणी संकुलातच शिरते…
बीजे मार्केट हे उतारावर असल्याने आसपासच्या भागातील पाणी थेट मार्केट मधे येते. थेट आर.आर विद्यालय, बालगंधर्व व कृष्णा भरीत सेंटर जवळील पाणी हे मार्केट मध्ये व मार्केटच्या बाहेरून भरले जाते.