जळगाव समाचार | ३ जून २०२५
जिल्ह्यात पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात बदल्यांची मोहीम राबवण्यात आली असून एकूण 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांची अदलाबदल विशेष लक्षवेधी ठरली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाण्यावर, तर एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) करण्यात आली आहे.
याशिवाय इतर बदल्यांची माहिती पुढीलप्रमाणे:
• कावेरी कमलाकर – चोपडा ग्रामीण येथून शनिपेठ पोलीस ठाण्यावर
• दत्तात्रय निकम – अमळनेर पोलीस ठाण्यावरच कायम
• रंगनाथ धारबळे – शनिपेठ येथून यावल पोलीस ठाण्यावर
• प्रदीप ठाकूर – यावल येथून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यावर
• सुनील पवार – पारोळा येथून नियंत्रण कक्षात
• सहाय्यक पोनि. प्रमोद कठोरे – आर्थिक गुन्हे शाखेतून पहूर पोलीस ठाण्यावर
• सहाय्यक पोनि. जनार्दन खंडेराव – वरणगाव येथून यावल पोलीस ठाण्यावर
• सहाय्यक पोनि. अमितकुमार बागुल – भुसावळ बाजारपेठ येथून वरणगाव पोलीस ठाण्यावर
• सहाय्यक पोनि. प्रकाश काळे – पिंपळगाव हरेश्वर येथून जळगाव शहर पोलीस ठाण्यावर
• सहाय्यक पोनि. कल्याणी वर्मा – जळगाव शहर येथून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यावर
• पो.उ.नि. सोपान गोरे – पाचोरा येथून स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी)
या बदल्यांमुळे अनेक पोलीस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांचा कार्यभार लागणार असून, त्यांच्या कामामुळे स्थानिक पोलीस कार्यक्षमता अधिक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासन सुसूत्र करण्यासाठीच या बदल्या करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.