(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी पारोळा
पारोळा येथील फटाक्यांचे नामांकीत व्यापारी गोविंद एकनाथ शिरोळे यांचे सावित्री एजन्सीज या दुकानातून २०१६ साली शिरपूर येथील अशोक चैधारी यांनी दीड लाख रुपयांचा फटाक्यांचा माल उधार घेतला होता. यावेळी त्यांनी गोविंद शिरोळे यांना चेक दिला होता मात्र तो चेक बाउन्स झाल्याने सावित्री एजन्सीजचे प्रो.प्रा. गोविंद एकनाथ शिरोळे यांनी पारोळा खटला दाखल केलेला होता. (Parola, Jalgaon)
याप्रकरणी पारोळा न्यायालयाचे मा. न्यायाधिश एम.एस. काझी यांनी दि. १८/०७/२०२४ रोजी आरोपीला 2 महिन्यांचा सश्रम कारावयास व. २ लाख ५०हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने अधिकचा साधा करावासाची शिक्षा भोगावी लागेल. असेही सांगितले. फिर्यादी पक्षातर्फे ॲड अकील युसूफ पिंजारी, पारोळा यांनी कामकाज पाहिले.