जळगाव महानगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; भाजप बहुमतात

 

जळगाव समाचार | १६ जानेवारी २०२६

महानगरपालिकेच्या ७५ जागांपैकी जवळपास सर्व निकाल घोषित झाले असून, महायुतीने शहराच्या राजकारणावर स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडणूक प्रक्रियेत आधीच भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचे ६ असे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. आज, १६ जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीनंतर पक्षीय बलाबल स्पष्ट झाले आहे.

मतमोजणीअंती भाजपने ४६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमताचा ३८ चा आकडा सहज गाठला आहे. शिंदेसेनेला २२ जागा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ५ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला १ जागा, तर १ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या संख्याबळामुळे भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी अजित पवार गटाची महायुती सत्तेवर येणे निश्चित झाले असून, भाजपचा महापौर निर्विवाद होणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा उपमहापौर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे एकमेव विजयी उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांनाही महापालिकेत स्थायी समिती सभापतीपद अथवा एखादे महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक १
१ अ – रिता विनोद सपकाळे (भाजप)
१ ब – दिलीप बबनराव पोकळे (शिवसेना)
१ क – संगीता दांडेकर (शिवसेना)
१ ड – भारती सागर सोनावणे (अपक्ष)

प्रभाग क्रमांक २
२ अ – सागर शामकांत सोनवणे (शिवसेना)
२ ब – उज्ज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना)
२ क – पूजा विजय जगताप (भाजप)
२ ड – विजय गजानन बांदल (भाजप)

प्रभाग क्रमांक ३
३ अ – अर्चना संजय पाटील (भाजप)
३ ब – प्रतीक्षा कैलास सोनवणे (भाजप)
३ क – प्रवीण रामदास कोल्हे (शिवसेना)
३ ड – निलेश विश्वनाथ तायडे (भाजप)

प्रभाग क्रमांक ४
४ अ – शशीबाई शिवचरण ढंढोरे (भाजप)
४ ब – विद्या मुकुंद सोनावणे (भाजप)
४ क – कल्पेश कैलास सोनवणे (भाजप)
४ ड – पियुष ललित कोल्हे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ५
५ अ – विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना)
५ ब – मंगला संजय चौधरी (शिवसेना)
५ क – आशा रमेश पाटील (भाजप)
५ ड – नितीन बालमुकुंद लड्डा (भाजप)

प्रभाग क्रमांक ६
६ अ – अर्शिन बानो शोएब खाटीक (शिवसेना उबाठा)
६ ब – शुचिता अतुल हाडा (भाजप)
६ क – अमित पांडुरंग काळे (भाजप)
६ ड – दीपक प्रभाकर सूर्यवंशी (भाजप)

प्रभाग क्रमांक ७
७ अ – दीपमाला मनोज काळे (भाजप)
७ ब – अंकिता पंकज पाटील (भाजप)
७ क – विशाल सुरेश भोळे (भाजप)
७ ड – चंद्रशेखर अत्तरदे (भाजप)

प्रभाग क्रमांक ८
८ अ – सागर पाटील (भाजप)
८ ब – मानसी निलेश भोईटे (भाजप)
८ क – अमर जैन (भाजप)
८ ड – नरेंद्र आत्माराम पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ९
९ अ – मनोज सुरेश चौधरी (शिवसेना)
९ ब – प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना)
९ क – जयश्री राहुल पाटील (भाजप)
९ ड – चंद्रशेखर शिवाजी पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक १०
१० अ – सुरेश माणिक सोनवणे (भाजप)
१० ब – माधुरी अतुल बारी (भाजप)
१० क – कविता किरण भोई (भाजप)
१० ड – जाकीर खान रसूल खान (भाजप)

प्रभाग क्रमांक ११
११ अ – डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे (शिवसेना)
११ ब – संतोष मोतीराम पाटील (शिवसेना)
११ क – सिंधुताई विजय कोल्हे (शिवसेना)
११ ड – ललित विजय कोल्हे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १२
१२ अ – अनिल अडकमोल (भाजप)
१२ ब – उज्ज्वला बेंडाळे (भाजप)
१२ क – गायत्री राणे (भाजप)
१२ ड – नितीन बरडे (भाजप)

प्रभाग क्रमांक १३
१३ अ – नितीन सपके (भाजप)
१३ ब – सुरेखा नितीन तायडे (भाजप)
१३ क – वैशाली अमित पाटील (भाजप)
१३ ड – प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक १४
१४ अ – सुनील सुपडू महाजन (भाजप)
१४ ब – जयश्री सुनील महाजन (भाजप)
१४ क – राबियाबी अमजद खान (भाजप)
१४ ड – रितिका संजय ढेकळे (भाजप)

प्रभाग क्रमांक १५
१५ अ – अरविंद देशमुख (भाजप)
१५ ब – कलाबाई नारायण शिरसाळे (भाजप)
१५ क – रेशमा कुंदन काळे (शिवसेना)
१५ ड – प्रकाश बालाणी (भाजप)

प्रभाग क्रमांक १६
१६ अ – डॉ. वीरेन खडके (भाजप)
१६ ब – वंदना संतोष इंगळे (भाजप)
१६ क – रंजना विजय वानखेडे (भाजप)
१६ ड – सुनील वामनराव खडके (भाजप)

प्रभाग क्रमांक १७
१७ अ – जरीनाबी शब्बीर शहा (शिवसेना उबाठा)
१७ ब – हीनाबी शाकीर खान (शिवसेना उबाठा)
१७ क – इब्राहिम पटेल (शिवसेना उबाठा)
१७ ड – अक्षय वंजारी (शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रमांक १८
१८ अ – डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे (शिवसेना)
१८ ब – नलूबाई तुळशीदास सोनवणे (शिवसेना)
१८ क – अनिता सुरेश भापसे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १९
१९ अ – रेखा चुडामण पाटील (शिवसेना)
१९ ब – गणेश (विक्रम) सोनवणे (शिवसेना)
१९ क – निकिता दुर्गेश वंजारी (शिवसेना)
१९ ड – राजेंद्र घुगे पाटील (भाजप)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here