जळगाव समाचार | २४ डिसेंबर २०२५
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सादेका बानो फिरोज शेख व फिरोज शेख हे दाम्पत्य उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. या इच्छुक उमेदवारीमुळे प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
फिरोज शेख यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रवास तब्बल २७ वर्षांचा असून, त्यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निष्ठा राखत कार्य केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रभाग क्रमांक ६ मध्ये सत्ताधारी नगरसेवक नसतानाही, फिरोज शेख यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत विविध विकासकामे मार्गी लावल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. नगरसेवक नसतानाही नगरसेवकांपेक्षा अधिक काम केल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.
उच्चशिक्षित, अनुभवी आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून फिरोज शेख यांचे नाव प्रभाग क्रमांक ६ मध्ये ठळकपणे पुढे येत असून, सादेका बानो फिरोज शेख यांची सामाजिक कार्यातील सक्रिय उपस्थितीही या उमेदवारीला बळ देणारी ठरत आहे. राष्ट्रवादीकडून अंतिम उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभागातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

![]()




