चिन्या जगताप खुन प्रकरण; फरार तत्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाडची शरणागती…

 

जळगाव समाचार डेस्क| ३० जुलै २०२४

गेली तीन वर्ष फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तत्कालीन अधिक्षक पेट्रस गायकवाडने अखेर काल ११ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसात शरणागती पत्करली असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.(Jalgaon)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहात २०२१ साली चिन्या उर्फ रवींद्र जगताप याला ठेवण्यात आले होते. यावेळी २०२१ साली तत्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड याच्यासह चौघांनी त्याला बेदम मारहाण करून खून केला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये मयत चिन्या जगताप यांची पत्नीला न्याय मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागत आहे. दरम्यान तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी, कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत हे या गुन्ह्यातील इतर चारही संशयितांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. सोबतच याआधीच सर्व पाचही जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे. दरम्यान आता सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पेट्रस गायकवाड (रा. विद्यानगर, पुणे) हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला शरण आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here