जळगावात 1 ऑगस्ट रोजी “इग्नाइट महाराष्ट्र 2024” कार्यक्रमाचे आयोजन…

 

जळगाव समाचार डेस्क| ३० जुलै २०२४

जळगाव (Jalgaon) जिल्हयातील उद्योजकांना क्षमता वृध्दीसाठी व शासनाच्या विविध योजनेचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे म्हणून ‘इग्नाइट महाराष्ट्र 2024’ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 01/08/2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत हॉटेल प्रेसिडेट कॉटेज, तळमजला, एमआयडीसी, जळगांव येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक व उद्योग घटकांनी इग्नाइट महाराष्ट्र 2024 च्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here